मिरजेत वाहतूक पोलिसांची ८६ जणांवर कारवाई ; अल्पवयीन चालक व नियम मोडणाऱ्यांना दंड

0
IMG-20260721-WA0013

मिरज (प्रतिनिधी)
मिरज वाहतूक पोलिसांकडून शहरात अल्पवयीन वाहनचालक, वाहतुकीचे नियम मोडणारे वाहनचालक यांच्याविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्यात आली. वाढते अपघात रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत तिप्पे व पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वाघ यांनी दिली.

शहरातील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अल्पवयीन वाहन चालक, विना नंबर प्लेट दुचाकी, वाहतुकीचे नियम मोडणारे दुचाकी चालक व वाहन चालक, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणारे वाहन चालक यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. ८६ जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. पालकांनी अल्पवयीन पाल्यांना वाहने चालविण्यास देऊ नये. तसेच नागरिकांनी अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत तिप्पे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *