सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून महात्मा बसवेश्‍वर संस्था कार्यरत-डॉ.सी.बी.कुरबेट्टी ः आरोग्य शिबीरास प्रतिसाद

0
DSC_7215

निपाणी,ता.28(प्रतिनिधी)-
महात्मा बसवेश्‍वर संस्थेने सहकारात पारदर्शकता कायम ठेवली आहे.त्यामुळेच ग्राहकांचा संस्थेवरील विश्‍वास वाढला आहे.ग्राहकांशी केवळ व्यावहारिक नाते न ठेवता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संस्था कार्यरत आहे.असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक डॉ. सी.बी. कुरबेट्टी यांनी केले.
येथील महात्मा बसवेश्‍वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था व सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.येथील चिकोडी रोडवरील संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या या शिबिराला शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी संस्थेचे चेअरमन किशोर बाळी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख प्राणलिंग स्वामीजी व उपस्थित मान्यवर तसेच विविध तज्ञ डॉक्टर्स व कर्मचारी सिद्धगिरी हॉस्पिटल कनेरी यांचे स्वागत केले. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संचालक महेश बागेवाडी यांनी श्रीफळ वाढवून केले. तसेच कार्यक्रमाचे द्वीपप्रज्वलन प्राणलिंग स्वामीजी तसेच संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ व सिद्धगिरी हॉस्पिटलचे डॉक्टर्स व महिला डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.मोफत शिबिरामध्ये अस्थिरोग. कृत्रिम गर्भधारणा, मज्जा रोग, स्त्री रोग, नेत्ररोग व इत्यादी तपासणी व औषधोपचार करून रुग्णांना डॉक्टरांनी सल्ला दिला, मोफत आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ 250 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. कार्यक्रमास संस्थेचे संचालक प्रताप पट्टणशेट्टी , डॉ.एस.आर.पाटील, ,श्रीकांत परमने, सुरेश शेट्टी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस.के.आदन्नावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, विद्या कमते , महादेव बडगीर, भद्रेश फुटाणे कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन संस्थेचे असिस्टंट सीईओ सुजाता जाधव,राजेंद्र मगदूम यांनी केले तर आभार संस्थेचे असिस्टंट सीईओ सुरज घोडके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *