कॉमर्स कॉलेज मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

0
कॉमर्स कॉलेज मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

२६ फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान दिन” कार्यक्रमाचे उद्घाटन करताना कॉन्सील ऑफ एज्युकेशन चे सेक्रेटरी ‘आदरनीय डॉ. विश्वनाथ मगदुम सर सोबत इतर मान्यवर

कोल्हापूर (प्रतिनिधी): देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्य विभागामार्फ २६ फेब्रुवारी रोजी “राष्ट्रीय विज्ञान दिन” मोठ्या व उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन कॉन्सील ऑफ एज्युकेशन चे सेक्रेटरी ‘आदरनीय डॉ. विश्वनाथ मगदुम सर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासण्याचे व संशोधनाची आवड निर्मान करण्याचे आवाहन केले.

      या दिनानिमीत्त विद्यार्थ्यांनी रांगोळी प्रदर्शनात सायन्य व टेकनॉलॉजी,पर्यावरण, मानवी जीवनाची उत्पत्ती, या विषयावर रांगोळी रेखाटल्या. तसेच पोस्टर, प्रेझेंटेशन, केमिस्ट्री शॉर्ट एक्सपेरियमेंट व प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सह‌भाग घेतला.

    यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. व्ही. व्ही. मैंदर्गी मॅम, रजिस्ट्रार मोहन पोवार, ज्युनि.कॉलेज प्राचार्य प्रा. व्हंडकर सर, सुपरवायझर प्रा. बी. डी. डवंग व सायन्य विभागाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *