यश डवरी यांचे राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवॉर्ड योजनेसाठी नामांकन.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी, संशोधनवृत्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन
सरूड. (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, सरूड येथील विद्यार्थी यश गोरक्ष डवरी याची केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैज्ञानिक विचारसरणी 2025–26 इन्स्पायर अवॉर्ड या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील योजनेअंतर्गत नामांकनासाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गौरव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी, संशोधनवृत्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी वैज्ञानिक विचारसरणी योजना राबविण्यात येते. या योजनेत निवड होणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब मानली जाते. यश गोरक्ष डवरी याने आपल्या अभ्यासातील सातत्य, जिज्ञासू वृत्ती आणि विज्ञान विषयातील विशेष आवडीच्या बळावर हे यश संपादन केले आहे.
या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एस. व्ही. सर यांचे प्रभावी मार्गदर्शन तसेच विज्ञान विषयाच्या शिक्षिका सौ. माने व्ही. डी. मॅडम, वर्गशिक्षक जाधव सर, यादव सर, हजारे सर, एस एम पाटील सर, सौ. पाटील मॅडम, सौ. तळवळकर मॅडम यांची प्रेरणा, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या कल्पकतेला योग्य दिशा देत त्याच्या वैज्ञानिक संकल्पनांचा विकास घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
00000


