वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये पालक शिक्षक मेळावा संपन्न
पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील समन्वय वाढवणे व विद्यार्थ्यांच्या ध्येयाला पालक व शिक्षक मिळून पूर्णत्वास घेऊन जाणे ह्या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन
वारणानगर.(प्रतिनिधी) श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, वासंतीदेवी पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्याल, कोडोली येथे पालक शिक्षक मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला. या मेळाव्यास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या मेळाव्यासाठी ७०हुन अधिक पालकांनी सहभाग नोंदवला. या मेळाव्याचा मुख्य हेतू म्हणजे पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील समन्वय वाढवणे तसेच विद्यार्थ्यांच्या ध्येयाला पालक व शिक्षक मिळून पूर्णत्वास घेऊन जाणे हा होता.
यादरम्यान महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा, तसेच महाविद्यालया मार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रमांची माहित व विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात कसे पुढे घेऊन जात आहोत याबद्दलची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस.मंज्जाप्पा यांनी पालकांना सांगितली. दरम्यान पालकांसमवेतचे विविध विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चालू व गतवर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रगतीचा आढावा देण्यात आला.
या मेळाव्यास संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील आणि विश्वस्त सौ. विनिता पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. मेळाव्यासाठी कार्यालय अधीक्षक सौ.वैशाली पोवार उपस्थित होत्या. या मेळाव्याचे नियोजन प्रा. उमेश पाटील प्रा. अर्पिता पोवार प्रा. पूर्वा पाटील यांनी केले. कार्यक्रमास पालक प्रतिनिधी, इतर पालक वर्ग,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
00000


