बोरगाव शादीमहल निधीबाबत विरोधकाकडून दिशाभूल ः काँग्रेस कार्यकर्त्याचा आरोप

0

बोरगाव,(प्रतिनिधी)-
बोरगाव शादी महल बांधकामासाठी व दोड्ड बस्ती कामासाठी निधी मंजूर करावा यासाठी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांनी वेळोवेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना भेटून बेंगळूर वारी करून पाठपुरावा केला.त्यानंतर जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांच्या विशेष प्रयत्नाने शादीमहल बांधकामासाठी 01 कोटी व दोड्ड बस्तीच्या कामासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला असताना हे काम आम्ही केले आहे असे विरोधक सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. या कामासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी व माजी मंत्री वीरकुमार पाटील, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांचेच प्रयत्न असून विरोधकांनी श्रेय न घेता जनतेची दिशाभूल थांबवावी असे कार्यकर्त्यांनी बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत आपले मत व्यक्त केले.आज सिद्धेश्‍वर सभा भवन येथे मुस्लिम व जैन कमिटीस मंजूर पत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी जैन कमिटीचे प्रमुख टी.डी.सवाडे, मुस्लिम कमिटीचे प्रमुख परवेज अफराज यांनी सदरचा निधी काँग्रेस सरकारमुळे मंजूर झाल्याचे सांगीतविद्याधर अम्मन्नावर, प्रशांत लगारे, अजित पाटील, संदीप कासार ,राजेंद्र वाळवेकर ,नितीन चिपरे, बाबासाहेब पाटील, मलगोंडा म्हैसाळे, विद्याधर अम्मन्नावर, बाबासाहेब पाटील,परवेज अपराज,रियाज मोमीन, बाळू अपराज, आयुब मकानदार, बबन मुजावर, रशीद मोमीन, जमील अत्तार, मुबारक गवंडी, इमाम बुरके, सलमान जमादार, शब्बीर आवटी, राजू मकानदार, जहाँगीर अफराज, इम्रान कापसे, बाबू कापसे, बाळासाहेब बसन्नवर,अजित फिरगन्नावर, भाऊसाब बंकापूरे, डॉ. महावीर बंकापूरे, यांच्यासह जैन व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *