प्रज्ञाशोध परीक्षेत रुद्रनिल नाईक जिल्ह्यात सहावा
रुद्रच्या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.
सरूड, (प्रतिनिधी):
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध निवड चाचणी परीक्षेत शाहूवाडी तालुक्यातील विद्यामंदिर शाळा क्रमांक 3 मधील इयत्ता चौथीचा विद्यार्थी रुद्रनिल प्रवीणकुमार नाईक याने 282 गुण मिळवत जिल्ह्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. रुद्रला या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक तसेच आई-वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमास विद्यामंदिर सरूड नं. ३ च्या मुख्याध्यापिका श्रीमती रावण मॅडम, नाईक मॅडम, कुंभार मॅडम, श्री. बोरगे सर तसेच शिक्षक मित्र सारिका कुराडे मॅडम उपस्थित होते.


