सरूड विद्यामंदिर शाळेत पाद्यपूजन सोहळा उत्साहात

0
IMG_20260330_182347

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरूडचे लोकनियुक्त सरपंच भगवान नांगरे पाटील (पापा) होते.

सरूड,  (प्रतिनिधी): शाहुवाडी तालुक्यातील सरूड येथील विद्यामंदिर शाळा नं. ३ व विद्या चेतना प्रकल्प, कनेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने सरूड येथील चौंडेश्वरी मंदिरामध्ये पाद्यपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. अनुराधा पाटील उपस्थित होत्या. तसेच ब्रह्माकुमारी बांबवडे सेंटरच्या विद्या बहिणजी यांचीही विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरूडचे लोकनियुक्त सरपंच भगवान नांगरे पाटील (पापा) होते.

   यावेळी उपसरपंच वंदना पाडळकर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र आपटे, पांडुरंग नांगरे, रामदास वावळे, पूनम कांबळे, दिपाली कुंभार, सुनीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. उमेश कुलकर्णी व उपाध्यक्ष मीना राठोड यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली. एकूणच हा पाद्यपूजन सोहळा भक्तीमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बोरगे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका श्रीमती रावण मॅडम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *