द्रोणागिरी आश्रमात श्री वीर हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

0
WhatsApp Image 2026-04-02 at 3.04.22 PM

द्रोणागिरी आश्रमात श्री वीर हनुमान जन्मोत्सव भक्तिभावात साजरा

कोल्हापूर,  (प्रतिनिधी) : द्रोणागिरी आश्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री वीर हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी असंख्य भाविकांनी उपस्थिती लावून परिसर भक्तिमय केला. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. श्री. वटारकर यांचे कीर्तन, कुलदीप जाधव यांचे स्वामी समर्थ कथावाचन केले.

       स्वरगंगा महिला भजनी मंडळ, श्री सिद्धलिंग छत्रे (कोल्हापूर) यांचे भजनी मंडळ व श्री अवधूत महिला भजनी मंडळ यांचे सादरीकरण झाले. सौ. वंदना कांबळे यांचा भावगीत कार्यक्रम आणि महेश पाटील यांचा अमृतनाथ कार्यक्रम रंगला. होमहवन व पूजापाठ अँड. समीर तेंडुलकर यांच्या हस्ते पार पडला.

   हनुमान जयंतीनिमित्त पहाटेपासूनच अभिषेक, प्रवचन, शंखतीर्थ आरती, जप व गजर करण्यात आला. पहाटे ६.३४ वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 संध्याकाळी नयनरम्य आतिषबाजीसह पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. त्यानंतर गजराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सोहळ्यासाठी मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक आदी ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *