रयतच्या शाहू कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाचे यश
डॉ. समाधान पवार व डॉ. किशोर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी पदवी प्रदान
कोल्हापूर (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी रोड, कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले स्नेहा विजयकुमार कोपार्डे, दिलीप दादा अनुसे, पंकज सोपान हसबे व निलम धणे ह्या चार विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी पदवी बहाल केली आहे. स्नेहाने “सिंथेसिस ऑफ मॉडिफाइड कार्बन मटेरियल्स फॉर सेंसिंग अँड एनवोर्मेंटल रेमेडिएशन एप्लीकेशन्स’’ या विषयावर, दिलीप दादा अनुसे यांनी “स्टुडि्स ऑन रिमोवल ऑफ ऑरगॅनिक अँड इनऑरगॅनिक पोल्लूटंट्स बाय युजिंग अडसॉरपेंशन टेक्निक” या विषयावर तर पंकज सोपान हसबे यांनी “डेव्हलपमेंट ऑफ क्रोमॅटोग्राफिक मेथड्स फॉर फार्मासिटिकल कंपाऊंड्स बाय कॉलिटी ऍप्रोच” या विषयावर, निलम सर्जेराव धणे हिने “अॅन इफिसिएट अॅड ग्रीन प्रोटीकल फॉर नायट्रोजन अॅड ऑक्सिजन काऊटिंग हेट्रोसायकल्स” या विषयावर शिवाजी विद्यापीठाला शोध प्रबंध सादर केला होता. त्यांच्या ह्या संशोधनाला शिवाजी विद्यापीठाने नुकतीच विद्यावाचस्पती पदवी बहाल केली आहे.
ह्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सोमनाथ पवार व डॉ. किशोर गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांपैकी डॉ. स्नेहा कोपार्डे यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर येथून पूर्ण केले आहे. त्यांना पीएच.डी संशोधनासाठी महाराष्ट्र शासनाची महाज्योती फेलोशिप मिळाली होती.
महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाचे शिवाजी विद्यापीठाचे मान्यता प्राप्त संशोधन केंद्र आहे. याबरोबरच संशोधनासाठी परिपूर्ण अशी अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध आहे. अनेक विद्यार्थी येथे आपले संशोधन करीत आहेत.
ह्या सर्व विद्यार्थ्यांचे, संशोधन मार्गदर्शक डॉ. समाधान पवार व डॉ. किशोर गायकवाड यांचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले व रसायनशास्त्र विभागप्रमुख तथा विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या, प्रा. डॉ. पी. बी. पिस्टे यांनी केले.


