स्वर्गीय पी. एन. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त २७५ रक्तपिशव्यांचे संकलन

0
WhatsApp Image 2026-05-24 at 10.41.10 AM

सांगरूळ (प्रतिनिधी) : स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात भासणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन विठाई-चंद्राई शैक्षणिक व सामाजिक फौंडेशन यांच्या वतीने वाकरे फाटा येथील चंद्राई-विठाई लॉन येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून तब्बल २७५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा टाटा मोटर्स कामगार युनियनचे माजी अध्यक्ष प्रकाश अर्जून मुगडे आणि जिल्हा परिषद सदस्या रेखाताई प्रकाश मुगडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले.

वैभव लक्ष्मी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. सामाजिक बांधिलकी जपत अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना फौंडेशनच्या वतीने रक्तदान प्रमाणपत्र, अल्पोपहार आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषद सदस्य क्रांतीसिंह संपत पवार-पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सभापती साताप्पा पाटील, लताताई दिंडे, मेघा आनंदराव नाळे, आशा प्रविण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, माजी सरपंच सूर्यकांत दिंडे, आनंदराव नाळे, कृष्णात चाबुक, विष्णू पाटील, संभाजी पाटील, शंकरराव पाटील, भगवान देसाई, शिवाजी देसाई यांच्यासह विविध तरुण मंडळे, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी आणि रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *