मिरजेत स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना; १४३ वी जयंती उत्साहात
मिरज (प्रतिनिधी)
येथील दत्त मंदिर चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त मानवंदना व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका अपर्णा विवेक शेटे व पद्मावती फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक शेटे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमात शुभम पत्की यांनी सावरकरांच्या विचारांचे व वचनांचे वाचन करून उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. तसेच प्रार्थना बंडोपंत कुलकर्णी यांनी सादर केली.
यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, पांडुरंग कोरे, डॉ. साठी, दयानंद खोत, नितीन देशमाने, सुधीर नाईक, दिगंबर कुलकर्णी, भूषण हिरेमठ, योगेश शिरपूरकर, जितेंद्र ढोले, दिलीप नाईक, अश्विन कोरे, महेश कुलकर्णी, राजेंद्र बेडेकर, अभिजित लाड, प्रकाश शहा, मनीष देशपांडे, सार्थक गोसावी, हुलवान, गुरुजी राजेंद्र पाटील, वाय. सी. कुलकर्णी, राजाभाऊ देसाई, सुधीर गोरे, हंबर्डेकर काका, श्री. धोपाडे, गजानन कवठेकर, दत्ता भोकरे, सोमनाथ गोटखिंडी, सतीश शिंदे, भैय्या खाडीलकर, रूपाली देसाई, महादेवी यादव, विनायक सावंत, सागर घाडगे, शंकर अण्णा ईसापुर, मिलिंद भिडे, ऋषिकेश कुलकर्णी, नगरसेवक मोहन वाटवे यांच्यासह स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था हिंदुस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व दत्त रिक्षा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मंडळाचे बाळासो विभुते, राजेंद्र पाटील व बंडोपंत कुलकर्णी यांनी केले.


