आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव ; एमटीडीके स्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य व लाडूची तुला

0
WhatsApp Image 2026-06-02 at 7.07.42 PM

मिरज (प्रतिनिधी)

सांगलीचे माजी पालकमंत्री आणि मिरजेचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध उद्योजक पद्मश्री अशोकआबा खाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मिरजेतील मातोश्री तानूबाई दगडू खाडे स्कुलमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार सुरेश भाऊ खाडे आणि प्रसिद्ध उद्योजक पद्मश्री अशोक आबा खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची पुस्तक, वह्या आणि लाडूची तुला करण्यात आली.

शैक्षणिक साहित्य मिरज हायस्कूल मिरज तसेच महापालिका शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी सौ.सुमनताई सुरेश भाऊ खाडे, युवा नेते सुशांत भाऊ खाडे, भाजपाच्या जिल्हा महिला अध्यक्षा सौ.स्वातीताई खाडे, श्री. सुजित खाडे, सौ.रसिका ताई खाडे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांना बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, पृथ्वीराज देशमुख, ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील, समित कदम, पृथ्वीराज पाटील, शरद लाड, संग्राम देशमुख, निशिकांत दादा पाटील, राजाराम गरुड, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, नगरसेवक गणेश माळी, शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग, धनंजय कुलकर्णी, डॉ. महेश कुमार कांबळे, फारूक जमादार, नितेश कांबळे, बाबासाहेब आळतेकर, चैतन्य भोकरे यांच्यासहत विविध क्षेत्र आणि पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. डिजिटल तसेच इतर खर्चाला फाटा देऊन या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन भाजपाचे वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *