मिरजेत शेळीवर लैंगिक अत्याचार; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल, परिसरात खळबळ

0
WhatsApp Image 2026-07-06 at 4.16.34 PM

मिरज (प्रतिनिधी)

शहरातील सुभाषनगर परिसरात पाळीव शेळीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत शेळीचे मालक राजकुमार रामचंद्र अलगुरे (वय ४०, रा. गल्ली क्रमांक २, होळे प्लॉट, सुभाषनगर, मिरज) यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अलगुरे हे शेतमजुरीसोबत जोडधंदा म्हणून पत्र्याच्या शेडमध्ये शेळीपालन व्यवसाय करतात. फिर्यादीनुसार, त्यांच्या घरासमोरील आकाश हाके (रा. होळे प्लॉट, सुभाषनगर, मिरज) याने शेडमध्ये जाऊन त्यांच्या पाळीव शेळीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून मिरज ग्रामीण पोलिसांनी संबंधित संशयिताविरुद्ध प्राणी छळासह संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *