मिरज बस डेपोत नवीन ‘राजमाता’ बसेस दाखल; आ. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या हस्ते लोकार्पण

0

मिरज (प्रतिनिधी)
शहर व परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मिरज आगारात दाखल झालेल्या नवीन ‘राजमाता’ बसेसचे लोकार्पण आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आ. खाडे म्हणाले की, मिरज हे शिक्षण, आरोग्य, व्यापार व उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असून दररोज हजारो प्रवासी एस.टी. सेवेचा लाभ घेतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करणे ही काळाची गरज आहे. नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता’ बसेसमुळे शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बसेसमध्ये प्रशस्त आसन व्यवस्था व प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध असून विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच वेळेवर व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यास या बसेस उपयुक्त ठरणार आहेत. यावेळी आ. इद्रिस नायकवडी, मोहन वनखंडे, महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार, फारूक जमादार, नगरसेवक मोहन वाटवे, डॉ. महेशकुमार कांबळे, विवेक शेटे, योगेंद्र थोरात आणि विलास देसाई यांचेसह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी, मिरज आगाराचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *