निपाणीत राम मंदिराजवळ घराला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

0
IMG-20261015-WA0223
filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:29facing:0;
hw-remosaic: 0;
touch: (-1.0, -1.0);
modeInfo: ;
sceneMode: Auto;
cct_value: 0;
AI_Scene: (-1, -1);
aec_lux: 0.0;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~15: 0.0;

निपाणी,ता.15(प्रतिनिधी)-शहरातील राममंदिर परिसरात असलेल्या चैतन्य शशिकांत नेसरीकर यांच्या मालकीच्या घराला आज गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीमध्ये घरासह घरातील संसारापयोगी साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.आगीच्या वेळी सुदैवाने घरात कोणीही उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नेसरीकर यांच्या बंद घरातून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडताना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तात्काळ प्रसंगावधान राखून निपाणी अग्निशामक दलाशी संपर्क साधला.आगीची माहिती मिळताच निपाणी अग्निशामक दलाचा एक बंब आणि हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचा दुसरा बंब घटनास्थळी दाखल झाला. आगीची भीषणता अधिक असल्यांमुळे सुरुवातीला अडथळे येत होते, मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि कारखान्याच्या आपत्कालीन पथकाने परिसरातील नागरिकांच्या मदतीने एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. तोपर्यंत घरातील फर्निचर, कपडे आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून पोलीस व महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *