निपाणीत युवकाचा निर्घृण खून ः परिसरात खळबळ

0
Screenshot_2026_0918_123219

निपाणी,ता.18(प्रतिनिधी)
शहरातील जत्राट वेस परिसरात युवकाचा खून करण्यात झाल्याची धक्कादायक घटना घडली.अभिषेक अनिल बामणे असे मृत युवकाचे नाव आहे.गुरूवारी रात्री ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याने संशयिताने अभिषेकच्या पोटावर धारदार शस्त्राने गंभीर वार केले.त्यामध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या थरारक घटनेमुळे जत्राट वेस परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच निपाणी बसवेश्‍वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पोवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेतले आहे.मृताचे महात्मा गांधी रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *