शाहू कॉलेजच्या राष्ट्रीय जलतरणपटू सागर प्रशांत पाटील जलतरण तलावाच्या जलतरणपटूंचे  धवल यश

0
शाहू काँलेज

नऊ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी): सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये शाहू कॉलेज कोल्हापूरच्या  येथील राष्ट्रीय जलतरणपटू सागर प्रशांत पाटील जलतरण तलावामधील नऊ खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

            राष्ट्रीय जलतरणपटू सागर प्रशांत पाटील जलतरण तलावावर सराव करणाऱ्या या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

          विजेत्या खेळाडूंची कामगिरी पुढीलप्रमाणे : महेंद्र सरनोबत याने  ५०, १०० आणि २०० मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्णपदक, भार्गव परबने ५०, १०० आणि २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक, आदित्य कट्टीमनी याने  २०० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदक, मुग्धा वाटवे हिने  १०० मीटर बॅक स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक  आणि २०० मीटर आय. एम. मध्ये कास्यपदक, कु.सिया शेट्टे हिने ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक व २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये कास्यपदक, ओंकार वडणे याने  १०० मीटर बॅक स्ट्रोकमध्ये रौप्यपदक, यश राजमाने याने २०० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदक, क्रिश सूर्यवंशीने ५० आणि १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक, कु.आसावरी मोरे हिने ५०, १०० आणि २०० मीटर बॅक स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले.

        ह्या सर्व खेळाडूंना मानसिंग पाटील, अमर पाटील, अंकुश पाटील, संतोष डोकरे यांचे मार्गदर्शन मिळाले. ह्या खेळाडूंना रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई), महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले, डॉ. गणेश लवंगारे, डॉ. विक्रमसिंह नांगरे आणि सविता माजगावकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले. खेळाडूंच्या ह्या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *