श्रेया जेऊर हिची शिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट संघात निवड
श्रेया जेऊर
कोल्हापूर, (प्रतिनिधी): ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेज येथील बी.कॉम. भाग एकमध्ये शिक्षण घेणाऱ्या कु. श्रेया राजेंद्र जेऊर हिची पी. पी. सवाणी युनिव्हर्सिटी, गुजरात येथे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. श्रेया हिने आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर ही निवड मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयातर्फे तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
या यशाबद्दल ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी श्रेयाचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शारीरिक शिक्षण संचालिका लेफ्टनंट ज्योती लेंगरे व क्रीडा शिक्षिका पूजा ठाकूर यांचे मार्गदर्शन तिला लाभले.


