क्षयरोग मोहिमेच्या पडताळणीसाठी केंद्रीय पथकाची भेट

0
WhatsApp Image 2025-02-13 at 3.19.05 PM

कोल्हापूर, (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात 7 डिसेंबर 2024 ते 17 मार्च 2025 पर्यंत 100 दिवसीय क्षयरोग मोहीम सुरु आहे. या मोहिमेमध्ये अतिजोखमीचे गट व असुरक्षित भाग, संस्था यांची क्षयरोग निदानासाठी तपासणी सर्वेक्षण व  निक्षय शिबिरे घेतली जात आहेत. तसेच जनभागीदारी व कॅम्पेन ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

या मोहिमेच्या कामकाज पडताळणीसाठी केंद्रीय पथकाने उपकेंद्र वाशी ता. करवीर व प्राथमिक आरोग्य केंद्र, पुलाची शिरोली येथे भेट दिली. या समितीमध्ये डॉ.विवेकानंद गिरी, सह संचालक सार्वजनिक आरोग्य व उप पोर्ट आरोग्य अधिकारी, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार हे या पथकाचे मुख्य सदस्य असून जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. चेतन हांडे या पथकामध्ये सहभागी होते.

या पथकाने उपकेंद्र वाशी येथे 100 दिवशीय क्षयरोग मोहिमेची पडताळणी केली व कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी  शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य, रांगोळी स्पर्धा असे उपक्रम राबवण्यात आले. टीबी.चॅम्पियन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वाशी गावचे उपसरपंच यांनीही आरोग्य विभागाच्या कामकाजाबद्दल विशेष आभार मानले. समुदाय आरोग्य अधिकारी अनिल गंबरे यांनी  मोहिमेबाबत सादरीकरण केले.

यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. उत्तम मदने, वैद्यकीय अधिकारी डी. टी.सी. डॉ.माधव ठाकूर, वाशीच्या उपसरपंच सीमा पाटील नंदवाळचे सरपंच  अमर कुंभार, आप्पासो हजारे, मुख्याध्यापक, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व एसटीएस एसटीएलएस उपस्थित होते.

Central team visits to verify tuberculosis campaign

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *