मिरजेत महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

मिरज (प्रतिनिधी)
शहरातील ऑल इंडिया बहुजन समन्वय समिती, जय हिंद लोक चळवळ सांगली जिल्हा, सर्वधर्म समभाव अंध व अपंग सेवाभावी संस्था तसेच सावित्री फातिमा महिला आघाडी सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
केंब्रिज स्कूलच्या प्राचार्या श्रीदेवी कुल्लोळी, बेघर निवारा केंद्राच्या संचालिका सुरेखा कांबळे उर्फ शेख, ॲड. सबीया तांबोळी, डॉ. तब्बसुम शिकलगार, डॉ. अंजुम शेख, डॉ. ताजनी बिडीवाले, गौरी पाटील, रेहाना आत्तार, पिंकी कागवाडकर, डॉ.शबनम खान, आयशा दानवडे, सरकारी वकील ॲड. कविता पालेकर, आशिया पटवेकर, यास्मिन शेख, प्रा.अंजुम जमादार, रेश्मा फिरोज शेरकर, फिरदोस मुजावर, डॉ.तब्बसूम शिकलगार, शाहीन मुल्ला, गीतांजली पाटील, सीमा शिंदे, साझ सोलापुरे, मर्था साहू यासह विविध महिला भगिनींचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या उद्योजिका नाझिया शेख, डॉ.साबेरा तांबोळी, श्रीमती सरफराबी मुजावर यांच्या हस्ते हे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन गोविंद पाटील, डॉ.सबेरा तांबोळी, सुजाता पवार,जहीर मुजावर, नाझिया शेख, शाहीन मुल्ला, शिवाजी त्रिमुखे, हिदायत कादरी, सोहेल चौधरी, दावल शेख, कय्युम पठाण, सालम नदाफ, अब्दुल पठाण, विक्रम पवार यांनी केले. महिलांना रोपटे, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. समाजात वावरत असताना भेडसावणाऱ्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी सर्व महिलांनी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प केला व सत्कार करीत सदिच्छा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.