महात्मा गांधी चौक पोलिसांनी केली गांजावर चौथी धडक कारवाई

२ किलो ७०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त ; तीन अल्पवयीन मुले ताब्यात
मिरज (प्रतिनिधी)
येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून शहरात बेकायदेशीरत्या गांजा विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मोहीम राबवली जात असून आतापर्यंत ४ वेळा कारवाई करीत पोलिसांनी सुमारे पावणे दहा किलो गांजा हस्तगत केला आहे. पोलिसांनी नुकत्याच केलेल्या चौथ्या कारवाईमध्ये गांजा विक्रीमध्ये अल्पवयीनांचा सहभाग समोर आला आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करत गांजा हस्तगत केला असून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी महात्मा गांधी चौक पोलिसांनी दिनांक १४ फेब्रुवारी रोजी २ किलो ३०० ग्रॅम गांजा, दिनांक १८ फेब्रुवारी रोजी १ किलो ७०० ग्रॅम गांजा, दिनांक १० मार्च रोजी ३ किलो गांजा तर गुरुवारी १३ फेब्रुवारी रोजी २ किलो ७०० ग्राम गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये गांजा विक्री करणारे तिघे अल्पवयीन सहभागी असल्याचे समोर आले आहे. अधिक माहिती अशी की, मिरजेतील रॉकेल डेपो झोपडपट्टी येथे दोघे गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी सापळा वाचून कारवाई करून दोन किलो सातशे ग्रॅम गांजा हस्तगत केला. या ठिकाणी गांजा विक्री करण्यासाठी आलेले दोघे अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचे दोघे अल्पवयीन अन्य एका अल्पवयीनाकडून सदरचा गांजा घेऊन विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, धनंजय चव्हाण, हेड कॉन्स्टेबल अभिजीत धनगर, सुरज पाटील, अभिजीत पाटील, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, जावेद शेख, मोहसीन टीनमेकर, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, राजेंद्र हारगे, निवास माने, सायबर शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी हे अधिक तपास करीत आहेत.