प्रज्ञा शोध परीक्षेत खाडे स्कूलची मनस्वी भिसे जिल्ह्यात प्रथम

मिरज (प्रतिनिधी)
मालगाव (ता.मिरज) येथील दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडु खाडे पब्लिक स्कूल मधील मुलांनी प्रज्ञा शोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत ४१ मुलांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये शाळेचा १००% निकाल लागला आहे. तसेच २ री मधील मनस्वी भिसे हिने २०० पैकी १९० गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत शाळेचा नावलौकिक केला आहे.
तसेच अधिराज भरत पवार, सम्राज्ञी सतीश भानुसे, श्रीनिकेत दीपक बरगाले, अनघा दीपेश पाटील, शुभ्रा प्रमोद भगाटे, साई सतीश तवटे व पूर्वा राजेंद्र पवार या विद्यार्थ्यांनी चांगले गुण संपादन करत चांगले यश मिळवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थापक माजी मंत्री आ. डॉ. सुरेश खाडे, अध्यक्षा स्वाती खाडे, सुमनताई खाडे, सुशांत खाडे यांचे मोलाचे सहकार्य व स्कूलच्या मुख्याध्यापिका करुणा माने, शिक्षिका मनिषा जाधव व माणिक भानुसे यांचे मार्गदर्शन लाभले.