मिरजेत म.न.पा. शाळा क्र. १ मध्ये शिक्षक संतोष यादव यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी उभारली अनोखी पुस्तक गुढी

मिरज (प्रतिनिधी)
येथील म.न.पा. शाळा क्रमांक १ मध्ये नवोपक्रमशिल शिक्षक संतोष यादव यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी पुस्तकांची गुढी उभारली. माझी शाळा माझा उपक्रम अंतर्गत म.न.पा. शाळा क्रमांक 1 मिरज येथे पुस्तकांची गुढी उभा करण्यात आली. ज्ञान कधीही विकत मिळत नाही त्यामुळे ज्ञान सर्वश्रेष्ठ असते व ते पुस्तक वाचनातून मिळते. थोर ज्ञानी व्यक्ती या वाचनातून तयार झालेल्या आहेत. त्यांच्या स्मृतींना याप्रसंगी अभिवादन करण्यात आले.
गुढी पाडवा, पट वाढवा अंतर्गत इयत्ता पहिलीला दहा विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला. पहिलीच्या विद्यार्थ्यांना फेटे बांधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांना व पालकांना गुलाबपुष्प देऊन स्वागतोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेपासून अंबाबाई मंदिर पर्यंत सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी ग्रंथ दिंडी काढली.
गुढी पुस्तकांची, गुढी विचारांची, गुढी ज्ञानाची, गुढी अस्पृश्यता निर्मूलनाची अशाप्रकारे विद्यार्थिनी विविध गुढ्या उभा केल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या गुढ्या पाहून समाजातील सर्व स्तरातून गुणगौरव होत होता. शिक्षण,वृक्षारोपण लेक वाचवा, झाडे लावा, बिजारोपण, प्लास्टिक या विषयावर घोषणा देत दिंडी काढण्यात आली. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक उत्सुकतेने येत होते. श्रीमती सुलभा ढमाले, सौ. महानंदा राजमाने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, संतोष यादव यांनी मार्गदर्शन केले.