मिरजेत ‘ऑर्केस्ट्रा स्वरांजली’ हिंदी व मराठी गीतांच्या बहारदार कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
WhatsApp Image 2025-04-29 at 4.12.24 PM

मिरज (प्रतिनिधी)
शहरात ऑर्केस्ट्रा स्वरांजली हा जुन्या नव्या हिंदी व मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आरपीआय अशोक कांबळे गटाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांची कन्या, कुमारी ऐश्वर्या अशोक कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वरांजली हा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रेक्षकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.


अशोक कांबळे आणि प्रसाद हेगिष्टे निर्मित ऑर्केस्ट्रा स्वरांजली या कार्यक्रमांमध्ये मुंबई, पुणे, रत्नागिरी, गोवा, कोल्हापूर येथील नामवंत गायक आणि वादक यांचा अप्रतिम परफॉर्मन्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. सुप्रसिद गायक, कलाकार, अत्याधुनिक साऊंड, सिस्टिम आणि नेत्र दीपक लाईट सिस्टीम हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.


या कार्यक्रमात अमोस मोहिते, रणजित बुगळे, नितीन देसाई, संगीता बांदेकर, स्वप्ना कोरवी, समर्थ कांबळे, विनोद सावंत, अनिकेत ससाणे, अविनाश इनामदार, आकाश साळुंखे, गणेश साळुंखे, उद्धव जाधव, मनोज जोशी आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित कुलकर्णी यांनी केले. माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी गायलेल्या गाण्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


या कार्यक्रमास उपयुक्त स्मृती पाटील, माजी नगरसेवक संजय मेंढे, डॉ. रवींद्र ताटे, माजी नगरसेवक साजिद अली पठाण, श्रीमती चंद्रिका विवेक कांबळे, सौ. प्रेमा अशोक कांबळे, राजू विवेक कांबळे, सौ. राजश्री राजू कांबळे, आकाश राजू कांबळे, सौ. अनीता आकाश कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजीत आठवले, प्राध्यापक अविनाश जकाते, भास्कर जगताप, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, नंदकुमार कांबळे, राम कांबळे, प्रमोद वायदंडे, प्रमोद कांबळे, शब्बीर चिवेलकर, संजय काबळे यांच्या सहित विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *