खाडे शाळेतील छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी “कारगिल विजय दिवस’निमित्त शहीदांना वाहिली श्रद्धांजली

मिरज (प्रतिनिधी)
कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे. २६ जुलै हा कारगिल दिन म्हणून साजरा होतो, अशी माहिती राष्ट्रीय छात्र सेनेचे ANO विक्रांत गौंड यांनी मालगाव येथील शहीद स्मारक येथे १९९९ मध्ये पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगिल युद्धामध्ये शहिद झालेल्या अधिकारी व सैनिकांना भावपूर्ण आदरांजली वाहताना विद्यार्थ्यांना दिली.
या आदरांजली कार्यक्रमासाठी 16 MAH BN NCC सांगलीचे CO चंद्रशेखर साठे, AO अभिजीत बर्वे तसेच सर्व PI स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच माजी कॅबिनेट मंत्री आ.सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील, करुणा माने यांचे सहकार्य लाभले. यावेळी मालगाव या गावातील विनायक पवार व संजय सुतार आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.