मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती व अभिमान आहे-डॉ.संतोष माने

0
1000291615

मेन राजाराम मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

 कोल्हापूर.(प्रतिनिधी) मातृभाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपली संस्कृती, इतिहास आणि ओळख टिकवून ठेवते.प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेतल्यास संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि सर्जनशीलता वाढते. इंग्रजी किंवा इतर जागतिक भाषांचे ज्ञान करिअर, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आवश्यक आहे. पण आपल्या मराठी भाषेविषयी आपणास नितांत आदर, आपुलकी असणे आवश्यक आहे असे मत डॉ संतोष माने यांनी व्यक्त केले.

  डॉ.माने जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या प्रशालेत आयोजन केलेल्या मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.

  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ गजानन खाडे म्हणाले,”मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून तो आपला सांस्कृतिक वारसा, स्वाभिमान आणि आत्मविश्वास आहे”. तो स्वाभिमान, अभिमान या सोशल मीडियाच्या जमान्यात जपूया, हा संस्कृतीचा लामण दिवा तेवत ठेवूया.

    या दिवसाचे औचित्य साधून कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पत्रास कारण की हा उपक्रम घेण्यात आला. सद्यपरिस्थितीत मराठी भाषेची असणारी स्थिती याचे वास्तव चित्रण व्यक्त करणारे पत्र कविश्रेष्ठ कुसुमाग्रज,वि वा शिरवाडकर यांना लिहून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना या पत्रात मांडल्या.‌ यामध्ये सलोनी बारे, श्रेया कळंत्रे, मेहजबीन मुल्लाणी, सिद्धी शरद पाटील, संध्या पोवार, जान्हवी शेवरे, स्वराजंली पाटील,  अनुराधा सिद्धनेर्ली, प्रियांका यादव या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सलोनी बारे,श्रेया कळंत्रे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब माळवे, फलकलेखन विकास पाटील, सूत्रसंचालन सुषमा पाटील, आभार अनिल लाड यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्या वनिता खडके, बाबुराव यादव, हर्षवर्धन काटकर,संजय कुंभार, राहूल देशमुख, अयोध्या धुमाळ,दिपा लोहार, प्रमिला मळगे,राजू मोरे, संगिता चव्हाण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *