महिलांसाठी कॅन्सर तपासणी व मोफत सल्ला अभियान
संपूर्ण मार्च महिन्यात डॅा. अक्षय शिवछंद यांच्या क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर येथे सोय
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे आणि कॅन्सरचे लवकर निदान करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर तर्फे मार्च महिन्यात विशेष मोफत कॅन्सर सल्ला अभियान आयोजित करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत नवीन महिला रुग्णांसाठी स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यांसंदर्भात मोफत वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. आजच्या काळात स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग हे महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळून येत आहेत. योग्य वेळी तपासणी आणि उपचार केल्यास हे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात. महिलांमध्ये जनजागृती होण्यासाठी क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर कडून या अभियानाचे आयोजन केले आहे.
या उपक्रमामध्ये तज्ज्ञ ऑन्कोलॉजिस्ट कडून मोफत सल्ला, आवश्यक तपासण्यांविषयी मार्गदर्शन, कॅन्सर प्रतिबंध व लवकर निदानाविषयी समुपदेशन, सवलतीच्या दरामध्ये कीमोथेरपी व इम्युनोथेरपी होणार आहे.
स्तनामध्ये अचानक गाठ जाणवणे, स्तनात बदल दिसणे, अनियमित रक्तस्राव, पांढरे पाणी जाणे किंवा इतर कोणतीही शंका असल्यास महिलांनी विलंब न करता तपासणी करून घ्यावी.
महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर चे तज्ञ डॅा. अक्षय शिवछंद यांच्या तर्फे करण्यात आली.


