मिरजेत शिवतीर्थ येथे ऋषीपंचमी निमित्त सामुहिक श्रीअथर्वशीर्ष पठण

0
1000500841

मिरज शहर अथर्वशीर्ष महिला मंडळाचा उपक्रम

मिरज (प्रतिनिधी – विनायक क्षीरसागर)
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक(शिवतीर्थ) येथे सामुहिक श्रीअथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम अभुतपूर्व उत्साहात संपन्न झाला. ओम गं गणपते नम: ह्या मंत्राचे १०८ वेळा पठण,अथर्वशीर्ष पठणाची अकरा आवर्तने, फलश्रुती आणि महाआरती करून कार्यक्रमाची सांगता झाली.

श्रीमंत युवराज माधवराजे पटवर्धन, उपायुक्त स्मृती पाटील, सौ.सुजाता पाटील, भाजपच्या सौ.रूपाली देसाई, शितल खराडे, सुधीर अवसरे,आनंद राजपूत, मा.सरपंच आनंद गडदे, अमृतधारा सूक्तपठण मंडळ, सनातन संस्था यांच्या साधिका यांसह पाचशेहुन अधिक महिलांनी यात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *