बाचणी वर राहणार सीसीटीव्ही ची नजर

0
बाचनी

बाचणी ता.करवीर येथील ग्रामपंचायतीने वतीने गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले

हळदी (प्रतिनिधी ) बाचणी ता.करवीर येथील ग्रामपंचायतीने वतीने गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्याचे उद्घाटन करवीर पोलीस ठाण्याचे हवालदार महेश बाबळे यांच्या हस्ते करण्यात आले, सोबत सुहास पोवार, वासंती कारंडे, जयश्री पाटील होते.

     गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी व  नागरिकांना दिलासा देण्यासाठी बाचणीतील २२ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत, महिला, विद्यार्थिनी व व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीचे मोठे पाऊल उचलले आहे बाचणी ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ऐतिहासिक पाऊल म्हणावे लागेल. गावातील वाढत्या गुन्हेगारी घटनांना चाप लावण्यासाठी तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ग्रामपंचायतीने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. करवीर तालुक्यातील बाचणी ही ग्रामपंचायत विविध विकासकामांमध्ये अग्रेसर राहिली आहे. गावातील घरफोड्या, चोरी, मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरीसारख्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतःच्या निधीतून २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, ज्यासाठी सुमारे दोन  लाख रुपये खर्च झाले आहेत. हे कॅमेरे आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्टॉप, ग्रामपंचायत परिसर, सांस्कृतिक हॉल, गणपती मंदिर, भैरवनाथ पेठ इत्यादी ठिकाणी बसवले आहेत. या उपक्रमामुळे चोरी, घरफोड्या, गैरप्रकार आणि रात्रीबेरात्री होणाऱ्या घटनांवर करडी नजर ठेवता येणार आहे. ग्रामपंचायतीने सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला व  कचरा फेकणाऱ्या नागरिकांवर आळा घालण्यासाठीही कॅमेरे बसवले आहेत, त्यामुळे अस्वच्छतेवर देखील नियंत्रण मिळेल आणि गाव स्वच्छ राहील. वासंती कारंडे, सरपंच (बाचणी ग्रामपंचायत) महासत्ताशी बोलताना  म्हणाल्या, “गावाच्या सुरक्षेसाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी २२ हून अधिक कॅमेरे बसवले आहेत. या उपक्रमामुळे नागरिक निर्धास्तपणे राहू शकतील. पारदर्शक ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतरांसाठी आदर्श ठरेल.” गावसुरक्षा, महिलांची सुरक्षितता आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल आदर्शवत ठरत असून बाचणी ग्रामपंचायत इतरांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे.सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन करवीर पोलीस ठाण्याचे हवालदार महेश बाबळे, सुहास पोवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच वासंती कारंडे, उपसरपंच जयश्री पाटील, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बाजीराव कळंत्रे, भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव तळेकर, सुभाष पाटील, उदय साळवी, सागर सावेकर, दिपाली तळेकर, वैशाली साळवी, कृष्णात सावेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *