कुडित्रे ग्रामपंचायतीने केला आरोग्य उपकेंद्रास औषध पुरवठा

कुडित्रे येथील आरोग्य उपकेंद्रास औषध पुरवठा ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिला यावेळी सरपंच भारती पाटील उपसरपंच संभाजी भास्कर व सदस्य
कोपार्डे(प्रतिनिधी) आरोग्य उपकेंद्रास शासनाकडून औषध पुरवठा सुरळीतपणे होत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना रूग्णावर उपचार करणे अवघड झाले होते.याची दखल घेत ग्रामस्थांच्या आरोग्य सेवेसाठी कुडित्रे ग्रामपंचायतीने औषध पुरवठा केला. पावसाळ्याचे दिवस असल्याने गावामध्ये साथीचे आजार उद्भविण्याची शक्यता आहे. यासाठी रूग्णावर प्राथमिक उपचार करण्यासाठी औषधाची गरज होती.पण शासनाकडून आरोग्य उपकेंद्राला औषध पुरवठा होत नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. औषध नसल्याने सरपंच भारती पाटील यांनी आरोग्य सेवक दिनकर आरंडे यांच्या मागणी प्रमाणे आरोग्य उपकेंद्राला औषध पुरवठा केला आहे. यावेळी उपसरपंच संभाजी भास्कर,उर्मिला पाटील, आरती कुंभार,सुवर्णा चौगले,सुवर्णा भास्कर, शीतल खेडकर,जोत्स्ना पाटील,अजित पाटील, तुकाराम शेलार,राजाराम कदम व ग्रामविकास अधिकारी तानाजी पाटील,सचिन राऊत व ग्रा.प.कर्मचारी उपस्थित होते.