शहापूर-मोहरे परिसरात बिबट्याचा वावर

शहापूर ते आरळे दरम्यानच्या रस्त्यावर दिसलेला बिबट्या
बोरपाडळे (प्रतिनिधी) गेल्या काही महिन्यापासून बोरपाडळेसह शहापूर, मोहरे, माले आदी परिसरात बिबट्याचे दर्शन वारंवार होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण दिसू लागले आहे. शहापूर येथील गट नंबर 100 मध्ये वसंत सांगले यांना मागच्या पंढरवड्यात दर्शन झाले. माले येथे सोळसे शेतकऱ्याला दर्शन झाले होते.
गेल्या 3 दिवसापूर्वी मोहरेतील संभाजी भोसले यांना आणि नुकतेच शहापूरमधील जितेंद्र शेटे यांना आरळे ते शहापूर रोडवर दर्शन झाले आहे. यामुळे कमालीचे भीतीदायक वातावरण झाले असून शेतात जाताना शेतकरी घाबरत असल्याचे चित्र आहे. याबाबत वन विभागाला माहिती आहे. मात्र बिबट्या वारंवार ठिकाण बदलत असल्याने, ऊसप्रवण क्षेत्र असल्याने बिबट्यावर त्यांना त्यावर नजर ठेवणे अशक्य होत असल्याचे दिसत आहे.