खाटांगळे ग्रामसभेत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन व डॉल्बी बंदीचा ठराव

खटांगळे येथे ग्रामसभेत बोलताना के एल पाटील सरपंच विश्वजीत कांबळे टी जी पाटील व इतर
सांगरूळ. (प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला .याबरोबरच डॉल्बी बंदीचा ठराव मंजूर करून कार्यक्रमासाठी पारंपारिक वाद्यांचा वापर करण्याचा निर्णय खाटांगळे (ता. करवीर ) येथील विशेष ग्रामसभेत घेण्यात आला .ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विश्वजीत कांबळे होते .मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल गेले कित्येक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न विद्यमान सरकारने विचारात घेऊन न्याय प्रक्रियेत टिकेल असे आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महायुती सरकारने अभिवचन दिल्याबद्दल या विशेष ग्रामसभेत अभिनंदनचा ठराव प्रकाश उर्फ प्रल्हाद पाटील यांनी मांडला त्यास पंडित पाटील यांनी अनुमोदन दिले. असा ठराव करणारी खाटांगळे ग्रामपंचायत ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली. तसेच नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवामध्ये गावातील अनेक तरुण मंडळांनी विसर्जनाच्या मिरवणुकीत डॉल्बी साउंड चा वापर केला गेला होता.
साऊंड सिस्टिमचा अतिरेक एवढा होता की गावातील अनेक वयोवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागला. रस्त्याशेजारी असणाऱ्या गोठ्यातील दूध दुबत्या, गाबन गाई, म्हशींवर साऊंड सिस्टिमचा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केली होती. यावर विचार विनिमय करण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी सर्वानुमते डॉल्बी बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला व या पुढील काळात कोणत्याही सामाजिक, वैयक्तिक कार्यक्रमात पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. ढोलकी बंदीचा ठराव नितीन पाटील यांनी मांडला त्यास के एल पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी प्राथमिक शाळेचे नूतन मुख्याध्यापक निवास चौगले यांचे स्वागत करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेविका शीतल पाटील यांनी केले. यावेळी उपसरपंच मीरा संदीप पाटील सदस्य एकनाथ पाटील, टी.जी. पाटील, तंटामुक्त अध्यक्ष पंडित पाटील, कृषी अधिकारी उमा गुरव, राजेंद्र पाटील, उल्हास पाटील, भिकाजी पाटील, सागर पाटील, मच्छिंद्र परीट, पांडुरंग पाटील, सर्जेराव पाटील, कृष्णात जांभळे, नितीन परीट, प्रल्हाद पाटील, अमर पाटील, प्रताप पाटील, रणझुंजार, हनुमान तालीम, राजर्षी शाहू, शिवप्रेमी, आझाद, छत्रपती शिवाजी तालीम, सेंट्रल ग्रुप, संघर्ष ग्रुप.मंडळांचे कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.