सांगरूळच्या राधाकृष्ण कला क्रिडा सामाजिक सांस्कृतिक मंडळाला गणराया अवॉर्ड

प्रथम क्रमांकाचे मानकरी राधाकृष्ण तरुण मंडळ सांगरूळ कार्यकर्ते
कोपार्डे.ता.20, (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस दल, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर , व करवीर पोलीस ठाणे अंतर्गत स्वस्त कोल्हापूर ,सुरक्षित कोल्हापूर गणराया अवॉर्ड २०२५ चे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते वाटप झाले. उपविभागीय गणराया अवॉर्ड, तसेच करवीर पोलीस ठाण्यांतर्गत गणराया अवॉर्ड असे दोन्ही अवॉर्ड सांगरूळ येथील राधाकृष्ण कला किडा सामाजिक सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष पंडित रावळ व कार्यकर्त्यांना देऊन गौरविण्यात आले. यावेळी करवीर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते. शिंगणापूर फाटा येथे कार्यक्रम झाला.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता म्हणाले , छत्रपती शाहू महाराज यांच्या या कोल्हापूर जिल्ह्यात जातीय सलोखा टिकून आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्ह्यात आम्ही डीजे वाजवणार नाही, या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात ८ हजार ५०० तरुण मंडळे असून ८ हजार मंडळांनी पुढाकार घेऊन पारंपरिक वाद्यात गणेशोत्सव साजरा केला आहे. गणेशोत्सवात १५ टक्के महिलांचा सहभाग होता, तो ५० टक्के झाल्यास अनुशासन येईल, या गणेशोत्सवात जिल्ह्यात एकही गुन्हा दाखल झाला नाही, शहरात मात्र सहा पर्यंत मिरवणूक व्यवस्थित झाली, रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक होऊ नये, पोलिसांची गरजच नसावी असे उत्सव साजरे व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.पोलिसांचा हा इतका मोठा कार्यक्रम पाहून ते भारावून गेलेत. प्रास्ताविक करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केले , उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांचे मनोगत झाले. यावेळी कागल पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, गांधीनगर अनिल तनपुरे ,शिरोली सुनील गायकवाड, गोकुळ शिरगाव तब्बसूम मगदूम ,इसपुरली मुद्दस्सर शेख ,मुरगुड शिवाजी करे प्रमुख, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सुरुवातीला ज्ञानोबा तुकोबा वारकरी संस्था तुरुंबेच्या वारकरी लहान मुलांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गणराया क्रमांक अनुक्रमे असे, राधाकृष्ण कला क्रीडा सामाजिक मंडळ सांगरूळ ,झलक फ्रंट सर्कल कसबा सांगाव, चौकार मित्र मंडळ शिये, उत्तेजनार्थ अष्टविनायक तरुण मंडळ बोरवडे कागल, गणेश मित्र मंडळ न्यू वाडदे , दिलदार तरुण मंडळ कनेरी ,अष्टविनायक तरुण मंडळ खेबवडे सर्व करवीर. सीसीटीव्ही ग्रामपंचायत साठी गिरगाव ,निगवे, बेले, बाचणी, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव गावामध्ये खेबवडे, कावणे ,जैताळ , नंदवाळ,वडवाडी, नंदगाव ग्रामपंचायत चा सत्कार झाला.
करवीर पोलीस ठाणे अंतर्गत गणराया अवॉर्ड, राधाकृष्ण मंडळ सांगरुळ, जय शिवराय तरुण मंडळ चिखली, वल्लिसो मंडळ वडणगे.पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणारे १९ मंडळे ,गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्याचा वापर करणारी १० मंडळे, कोगे गावातील पारंपरिक वाद्याचा वापर करणारी बारा मंडळे, डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यात उत्सव साजरा करणारी वाकरे येथील २१ मंडळे, करवीर पोलीस ठाणे अंतर्गत एक गाव एक गणपती १९ गावे , उत्तेजनार्थ मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच, सदस्य ,पोलीस पाटील, तरुण मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या. राष्ट्रगीताने सांगता झाली.