जमियत उलेमा ए हिंदच्या अध्यक्षपदी मुफ्ती पटेल तर जनरल सेक्रेटरीपदी हाफिज सय्यद बिनविरोध

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
सांगलीतील जमियत उलेमा ए हिंदच्या जिल्हाध्यक्षपदी मुफ्ती सादिक पटेल तर जनरल सेक्रेटरी म्हणून हाफिज सद्दाम सय्यद यांची चौथ्यांदा फेरनिवड झाली आहे. जमियत उलेमा हिंद(मौलाना मेहमूद मदनी ) यांचे कडून सांगली जिल्ह्यासाठी कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.
सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी हाफिज रौफ,मुनिर शेख उपाध्यक्ष सांगली जिल्हा मौलाना अमानूल्ला सांगली जिल्हा उपाध्यक्ष तर खजिनदार पदी तौसिफ कडलास्कर आणि सेक्रेटरी म्हणून अबीद मोमीन,तसेच मौलाना क्लीमुल्ला खान यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या नूतन जिल्हा कार्यकारीणीच्या निवडीची घोषणा प्रदेशाध्यक्ष मौलाना नदीम सिद्दिकी यांच्या मान्यतेनुसार करण्यात आली मुफ्ती सादिक पटेल आणि हाफिज सद्दाम सय्यद या दोघांची असून सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.त्यामुळे पदाधिकाऱ्यांमधून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. महापूर आणि कोरोनासारख्या नैसर्गिक आपत्तीत जमियत उलेमा ए हिंदच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेऊन मुफ्ती सादिक पटेल,आणि हाफिज सद्दाम सय्यद यांची निवड करण्यात आली असून निवडीवेळी जिल्ह्यातील अनेक धर्मगुरू उपस्थित होते. या नवीन जिल्हा कार्यकारीनीच्या वतीने जमियत उलेमा ए हिंदचे ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न होतील असा आशावाद सिद्धीकी यांनी व्यक्त केला आहे.