रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती महत्त्वाची – डॉ. उदय पाटील

0
KCC Photo


कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये ‘पेशंट सेफ्टी डे’ उत्साहात

कोल्हापूर . (प्रतिनिधी) कॅन्सर उपचारासाठी प्रख्यात कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे ‘वर्ल्ड पेशंट सेफ्टी डे २०२५’  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रुग्णांच्या देखभाली इतकीच त्यांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची असल्याचे मनोगत डॉ. उदय पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उदय पाटील उपस्थित होते.

रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे, उत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे आणि सामूहिक प्रयत्नांचा गौरव करणे हा या ‘वर्ल्ड पेशंट सेफ्टी डे’ कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कोल्हापूरसह परिसरातील अनेक रुग्णालयांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. डॉ. सोनिया राजपूत आणि डॉ. रेश्मा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. डॉ. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांचा परिचय आणि स्वागतपर भाषणे झाल्यावर प्रमुख पाहुणे डॉ. उदय पाटील यांनी रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक पद्धती व जागतिक मानकांवर प्रेरणादायी व्याख्यान दिले. विविध रुग्णालयांनी सादर केलेल्या उपक्रमांचे बेस्ट प्रॅक्टिसेस (पीपीटी व व्हिडिओ सादरीकरण) स्पर्धा घेण्यात आली.

परीक्षक मंडळींनी पोस्टर स्पर्धेचे निरीक्षण, सोशल मीडिया रिल्सचे सादरीकरण आणि क्विझ स्पर्धेची अंतिम फेरी याचे मूल्यांकन केले. याचबरोबर कार्यक्रमात सहभागी लोकांसाठी आनंददायी फन अ‍ॅक्टिव्हिटी घेण्यात आली. सर्व स्पर्धांचे विजेते घोषित करून पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. सीईओ डॉ. विवेक लाल यावेळी उपस्थित होते. हा इंटर-हॉस्पिटल सोहळा केवळ माहितीपूर्ण नव्हता, तर “Patient Safety is Everyone’s Responsibility” हा संदेश दृढपणे पोहोचवत, रुग्ण सुरक्षिततेसाठी शून्य हानी संस्कृती (Zero Harm Culture) निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला असल्याचे डॉ. रेश्मा पवार यांनी समारोपवेळी मार्गदर्शन करताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *