शाहू कॉलेज कदमवाडी येथे कर्मवीर जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

कोल्हापूर. (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ह्या व्याख्यानास प्रमुख व्यक्ते म्हणून कोल्हापुरातील परिवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृतिशील भागीदार साथी उमेश मुरलीधर सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहे. तर अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे हे भूषविणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रो. डॉ. पी. एस. पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्या, मा. सरोज पाटील (माई) ह्या व्याख्यानास उपस्थित राहणार आहेत.
व्याख्यानाचे प्रमुख वक्ते साथी उमेश मुरलीधर सूर्यवंशी यांनी आजवर सामाजिक आणि वैचारिक विषयावरील सात ग्रंथाचे लेखन केले आहे. चळवळीचा कार्यकर्ता व्याख्यानाच्या निमित्ताने अनुभवण्यासाठी आजी – माजी विद्यार्थी, रयतप्रेमी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांनी केले आहे.