राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचे योगासन स्पर्धेत यश रयत शिक्षण सस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज

रयत शिक्षण सस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज
कोल्हापूर.(प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण सस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजची इयत्ता 12 वी सायन्स मध्ये शिकणारी विद्यार्थीनी कु. अनन्या तानाजी पाटील हिने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या 19 वर्षाखालील मनपास्तर योगासन स्पर्धेतील आर्टिस्टिक सिंगल या प्रकारात प्रथम क्रमांक तर ट्रेडिशनल योगासन प्रकारात द्वितीय क्रमांक संपादन केला.
तसेच अनन्या पाटील हिने तिची जुळी बहीण राजर्षी शाहू कॉलेजमध्ये इयत्ता 12 वी सायन्स मध्ये शिकणारी कु. अव्दैता तानाजी पाटील हिच्या बरोबरीने योगासनाच्या मनपास्तर वर्षाखालील 19 वर्षाखालील आर्टिस्टिट पेअर या प्रकारात सहभाग घेवून त्यामध्येही प्रथम क्रमांक संपादन केला.
अनन्या व अव्दैता या दोघींचीही इचलकरंजी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या बहिणी-बहिणींच्या दुहेरी यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई), रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागाचे विभागीय अधिकारी मा. श्री. अशोक शिंदे साहेब यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
स्थानिक व्यवस्थापन कमिटीच्या चेअरमन सौ. संगीता प्रशांत पाटील, सदस्य मा. श्री प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. डी. आर. भोसले साहेब, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डी. एम. गायकवाडसर, उपप्राचार्या सौ. एल. बी. चव्हाण मॅडम यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या दोघांना तिचे वडील श्री. तानाजी पाटील, वर्गशिक्षिका सौ स्नेहा पाटील मॅडम व क्रीडा शिक्षक प्रा. रणजीत राणेसंकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.