विविध संस्थांतर्फे पापाची टिकटी येथे महात्मा गांधी जयंती संपन्न

महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना ॲड.धनंजय पठाडे सोबत अन्य मान्यवर
कोल्हापूर.(प्रतिनिधी) : पापाची टिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास विविध संस्थांतर्फे ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गांधीजीं नी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशातील चळवळींना अहिंसेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांनी नेल्सन मंडेला, मार्टिन लूथर किंग यांसारख्या नेत्यांनाही प्रेरणा मिळाली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट धनंजय पठाडे गांधी जयंती प्रसंगी व्यक्त केले .
यावेळी परिवर्तन चे अमोल कुरणे, खंडोबा तालमीचे शेखर पोवार, कुमावत सोसायटीचे सतीश बाचणीकर, फौजी ग्रुपचे ज्ञानेश्वर मोहिते, जे बी अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.