कोल्हापूर कॅन्सर सेंटरला डिजिटल मॅमोग्राफी प्रदान

“रोटरीचा उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरेल” – खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर – रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने राबवलेला उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी आज केले. येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने डिजिटल मॅमोग्राफी मशीनचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात खासदार महाडिक बोलत होते.
ते म्हणाले, समाजातील वाढत्या कॅन्सर रुग्णांच्या रोग निदानासाठी अशा मशीनच्या सहाय्याने लवकरात लवकर निदान करून त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल. डॉ. सूरज पवार म्हणाले, ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर म्हणून साजरा केला जातो. याच महिन्यात रोटरीच्या वतीने डिजिटल मॅमोग्राफी मशीन आले आहे. त्याचा रुग्णांसाठी फायदा होईल शिवाय आमच्यासाठी आनंददायी घटना आहे.
डॉ. रेश्मा पवार यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत लवकरात लवकर निदान होणे व उपचार सुरू करण्यासाठी अशा अत्याधुनिक मशीनची जरुरी आहे, जी यामुळे पूर्ण होऊन अचूक उपचार करणे सोपे जाईल.
सौ. अरुंधती महाडिक म्हणाल्या, रोटरी मिडटाऊनच्या माध्यमातून सर्वांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अत्याधुनिक अशी मशीनरी येथे उपलब्ध झाली. यामुळे उपचार करणे सुलभ होईल.
शरद पै म्हणाले, सर्वसामान्य रुग्णांना डिजिटल मॅमोग्राफीचा फायदा होऊन लवकरात लवकर उपचार करून त्यांची कॅन्सरपासून मुक्तता होईल.
यावेळी पृथ्वीराज महाडिक, नासीर बोरसादवाला, गौरी शिरगावकर, रितू वायचळ, केतन मेहता, सिद्धार्थ पाटणकर, विकास राऊत, पद्मजा पै, नरसिंह जोशी आदी उपस्थित होते. बी. एस. शिंपुकडे यांनी आभार मानले.