मिरज-बेळगाव-मिरज स्पेशल आता नव्या रुपात मेमु पॅसेंजर म्हणुन धावणार

मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
करोनानंतर बंद करण्यात आलेली मिरज बेळगाव मिरज पँसेंजर सुरु करण्यासाठी २०२३ मध्ये पुणे येथे झालेल्या मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीमध्ये सदर प्रस्ताव मांडण्यात आला व सतत पाठपुरवठा करण्यात आला होता.याची दखल घेऊन तसा प्रस्ताव पुणे विभागाकडुन रेल्वे बोर्डास पाठवण्यात आला होता.
रेल्वे बोर्डाकडुन दक्षिण – पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडुन मिरज बेळगाव मिरज स्पेशल सुरु करण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून स्पेशल दराने धावणारी ही गाडी पँसेंजर म्हणुन नियमीत सुरु करण्यात यावी यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेकडे सतत पाठपुरवठा केला होता. सदर मिरज – बेळगाव – मिरज स्पेशल गाडीची मुदत नोव्हेंबर मध्ये मुदतवाढ संपत असुन १ डिसेंबर २०२५ पासुन नियमीत होऊन पँसेंजर म्हणुन नव्या मेमुने धावेल. तिकीट दर कमी झाल्यामुळे नोकरदार,कामगार,व्यापारी,विद्यार्थी व वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्यांना फायदेशीर व सोईचे होईल असा विश्वास मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी व्यक्त केला आहे.
मिरज – बेळगाव – मिरज स्पेशल नियमीत करुन पॅसेंजर म्हणुन सोडण्यात यावी यासाठी रेल्वे प्रवासी संस्थाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, वाय.सी.कुलकर्णी, पंडीतराव कराडे, मधुकर साळुंखे, सोपान भोरावत, पांडुरंग लोहार व एकनाथ पोतदार यांनी पाठपुरवठा केला होता.