राजवीर पब्लिक स्कूल, वाशी येथे “राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांची भूमिका आणि सत्तेतील वाटा” विषयावर मार्गदर्शन शिबिर

0
राजवीर पब्लिक स्कूल, वाशी

हळदी /प्रतिनिधी ,वाशी (ता. करवीर) : लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्षांची भूमिका समजावून घेण्यासाठी राजवीर पब्लिक स्कूल, वाशी येथे इतिहास विभागाच्या वतीने “राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष – भूमिका व सत्तेतील वाटा” या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन केले.

           कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  बी. ए. पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थितीत अजित पोवार (जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना), भरत आमते (तालुका प्रमुख, शिवसेना उ.बा.ठा. गट), हंबीरराव पाटील (अध्यक्ष, भाजपा करवीर विधानसभा व उपाध्यक्ष, भोगावती साखर कारखाना शाहूनगर परिते) तसेच मा. बी. ए. पाटील साहेब (संस्थापक, श्रीराम उद्योग समूह, विद्यमान संचालक भोगावती साखर कारखाना) यांचा समावेश होता.

     या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या पक्षांची विचारसरणी, उद्दिष्टे आणि देश व राज्याच्या विकासात पक्षांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले. लोकशाही टिकवण्यासाठी मतदारांचे भान, सत्तेतील संतुलन राखण्याची गरज आणि युवकांच्या सक्रिय राजकीय सहभागाचे महत्त्व यावरही त्यांनी प्रेरणादायी विचार मांडले.

    विद्यार्थ्यांनी या संवादात्मक सत्रात उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून चर्चेत भाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष राजकारणातील विचारसरणी व व्यवहाराची ओळख मिळाली.
   या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी उपाध्यक्ष  एम. एस. पाटील, सागर पाटील, मुख्याध्यापिका वैष्णवी सरनोबत  के. एल. खाडे  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
  कार्यक्रमावेळी  पांडुरंग माळी, नंदवाळ गावचे सरपंच श्री. अमर कुंभार, तसेच श्री. डोंगळे, श्री. अशोक पाटील, श्री. आनंदा गाडे, श्री. कांबळे, श्री. दिंडे यांसह विविध पक्षांचे मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *