एरंडोलीतील श्री दासबोध पारायण कार्यक्रमास आमदार खाडेंकडून १५० दासबोध ग्रंथ प्रदान

मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
एरंडोली येथे संपन्न होत असलेल्या श्री ग्रंथराज दासबोध अपरायणासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी १५० दासबोध ग्रंथ भेट स्वरूपात प्रदान केले आहेत. मंगळवारी सकाळी आ. सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी ह.भ.प. डॉ. शरद गद्रे यांच्याकडे दासबोध ग्रंथ सुपूर्द केले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातील एरंडोली येथे श्री हनुमान मंदिरात वास्तुशांत, वास्तुप्रवेश, प्राणप्रतिष्ठा, कलशारोहन व ग्रंथराज दासबोध पारायण सोहळा बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर ते शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर अखेर साजरा होणार आहे. या सोहळ्यात भजन, कीर्तन, हरिपाठ, भारूड, रामरक्षा पठण यासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा व सोहळ्यास दररोज उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.