प्रा. अभिजीत आबासाहेब पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि युनिसेफचा बेस्ट ग्रीन क्लब समन्वयक पुरस्कार.

संस्थेचे चेअरमन अरुणरावजी खंजीरे, राहुलसाहेब खंजीरे, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ विरूपाक्ष खानाज यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूर. (प्रतिनिधी) शिंपे ता. शाहूवाडी गावचे सुपुत्र प्रा. अभिजीत आबासाहेब पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ यांच्या वतीने बेस्ट ग्रीन क्लब समन्वयक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचा वितरण सोहळा पुणे याठिकाणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रा. अभिजीत पाटील हे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी येथे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षातील ग्रीन क्लबमधील त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या विविध उपक्रमांसाठी महाविद्यालयाला इतर दोन पुरस्कारही प्राप्त झाले आहेत, त्यांच्या या यशात त्यांना संस्थेचे चेअरमन अरुणरावजी खंजीरे, राहुलसाहेब खंजीरे, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ विरूपाक्ष खानाज यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. अभिजीत पाटील हे कोडोली अर्बन बँकेचे संचालक आबासाहेब पाटील यांचे चिरंजीव आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून (D.H.E.)उच्च शिक्षण विभागातुन एकमेव त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.