साळुंखे कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांची पुणे येथे प्लेसमेंट आणि इंटर्नशिप प्रोग्रामसाठी निवड

0
WhatsApp Image 2025-10-08 at 12.21.55 PM

मिरज (प्रतिनिधी)
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज मिरज येथे कॉम्प्युटर सायन्स विभाग व प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लेसमेंट व इंटरशिप प्रोग्राम साठी आयोजित करण्यात आले होते. या ड्राइव्ह मध्ये किरण अकॅडमी पुणेच्या चिंचवड शाखेचे प्रमुख श्रीराम यादव यांनी ॲप्टिट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन व मुलाखत या तीन टप्प्यांमधून चार विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या प्लेसमेंट व इंटर्नशिप प्रोग्राम साठी निवड केली.

प्रणाली कोळी, श्रुती दळवी, गणेश पाटील व स्वाती पवार या चार विद्यार्थ्यांची निवड झाली. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील , महाविद्यालयाचे प्रबंधक रावसाहेब लवटे, कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख प्रा. विद्या कमाने तसेच विभागातील प्रा.कविता पाटील, प्रा. पूजा चव्हाण व प्रा. वेलाराणी आवळे आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा अभिषेक चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *