मराठी भाषा म्हणजे अनमोल ठेवा – प्रा. भीमराव धुळूबुळू

सांगली (प्रतिनिधी)
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृती, इतिहास आणि परंपरांचा अमूल्य ठेवा आहे. अभिजात दर्जा हा मराठीच्या समृद्ध परंपरेचा गौरव असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक भीमराव धुळूबुळू यांनी केले. कवठेमहांकाळ येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात मराठी भाषा वाङ्गयमंडळाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे प्रा. धुळूबुळू बोलत होते.
अभिजात मराठी भाषा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. धुळूबुळू यांनी मराठी भाषेला प्राप्त झालेल्या अभिजात दर्जाचे महत्त्व उलगडून सांगितले.
ते पुढे म्हणाले, आईच्या दुधाने शरीराची वाढ होते. तशी मातृभाषेत घेतलेल्या शिक्षणाने ज्ञानसंपन्न होऊन व्यक्तिमत्व घडते. इंग्रजी शाळेत भाषा शिकायची कि मराठी भाषेत याचा गोंधळ होऊन शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होतं नाही. या प्रसंगी प्राचार्य एम. के. पाटील अध्यक्षस्थानी होते तर उदघाटक प्रा. मोहन लोंढे हे होते. मराठी विभाग प्रमुख सरस्वती अंलगेकर यांनी प्रस्तविक केले. तर प्रा. अर्जुन राठोड यांनी आभार मानले. यावेळी माजी प्राचार्य अशोक बाबर, प्रा. शिवाजी कांबळे, प्रा. पूजा माळी आदी मान्यवर उपस्थित होते.