भोसेतील आदेश खामकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा ‘जनसुराज्य’मध्ये प्रवेश

0
WhatsApp Image 2025-10-10 at 2.25.22 PM

मिरज (प्रतिनिधी)  

भोसे (खामकर वस्ती) येथील अनेक नागरिकांनी समित कदम यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी आदेश खामकर, बबन खामकर, राजू खामकर, अजित खामकर, अक्काताई कदम, प्रियांका खामकर, रूपाली खामकर, मयुरी क्षीरसागर यांनी पक्षात प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेवर आपला विश्वास व्यक्त केला.

जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करताना सांगितले की, “जनसुराज्य शक्ती पक्ष हा सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष आहे. आपण सर्वांनी एकजुटीने काम करून पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवावी,”

या पक्षप्रवेशामुळे भोसेत जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद अधिक बळकट झाली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुरणे, शहराध्यक्ष योगेश दरवंदर, नाना घोरपडे, अरविंद पाटील, प्रवीण धेंडे, अशफाक मणेर, आनंदा देवमाने, असलम बाडवाले, अल्ताफ रोहिले यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *