मिरजेत आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्याहस्ते सुबोध ऊर्जा पार्क येथे वृक्षारोपण

0
khade

मिरज (प्रतिनिधी)
योगकर्मी सुबोध ऊर्जा पार्क सिव्हिल हॉस्पिटल मिरज या ठिकाणी सकाळी माजी मंत्री आ. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पेरूचे वृक्ष लावण्यात आले. इतरही झाडे लावल्याबद्दल संस्थेचे व कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले. आपल्या भागात येणारी झाडेच लावणे गरजेचे आहे. पर्यावरण संरक्षण काळाची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले.


यावेळी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, मिरज सिव्हिलचे अधिक्षक डॉ. रुपेश शिंदे, जीवन रक्षक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुधीर गोरे, संस्थेचे उपाध्यक्ष राकेश तामगावे, खजिनदार भालचंद्र आठवले, सदस्य महेश जोशी, अजिंक्य हंबर, चैतन्य भोकरे, पत्रकार दिगंबर शिंदे, अभिजित गौराजे, राकेश शिंदे, अमित पिसे, अतुल पिसाळ तसेच इतर वृक्षप्रेमी व निसर्गप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *