रयतच्या शाहू कॉलेजची सृष्टी भोसले आंतरविभागीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदकाची मानकरी

0
रयतच्या शाहू कॉलेजची सृष्टी भोसले

महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, . प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले, डॉ. विक्रमसिंह नांगरे यांचे मार्गदर्शन लाभले

कोल्हापूर. (प्रतिनिधी)  शंकरराव जगताप आर्टस व कॉमर्स कॉलेज वाघोली येथे शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय फ्रीस्टाईल महिला कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी रोड कोल्हापूर ह्या महाविद्यालयाची  विद्यार्थी सृष्टी जयवंत भोसले हिने फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये ६५ किलो वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केले.

          सृष्टीचे   रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण सुरू आहे. आजवर विद्यापीठस्तरीय अनेक स्पर्धामध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तिचे कुस्तीतील योगदान लक्षात घेवून शासनाने तिला छत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

तिच्या ह्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले,  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तिला  शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विक्रमसिंह नांगरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *