म्हैसाळ रोडवर देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

0
1000714417

सांगली (प्रतिनिधी)

मिरज-म्हैसाळ रस्त्यावरील टोल नाक्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, काडतूस असा 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिरोज सलीम शेख (वय १९, रा. बिसमिल्लाह कॉलनी, म्हैसाळ रोड, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अवैधरित्या हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक नितीन सावंत यांचे एक पथक तयार केले होते. पथक संशयितांचा शोध घेत असताना पथकातील अमोल ऐदाळे यांना यांना एक तरुण देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन म्हैसाळ रोडवरील टोल नाक्याजवळ फिरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून फिरोज शेख याला ताब्यात घेतले.त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतूस सापडली. शस्त्र बाळगण्याचा परवाना नसताना त्याने पिस्तूल बाळगल्याने पिस्तूल, काडतूसे जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याला मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत, अमोल ऐदाळे, आमसिध्द खोत, बाबासाहेब माने, बसवराज शिरगुप्पी, इम्रान मुल्ला, अनंत कुडाळकर, रोहन घस्ते, सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *